शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
गवळी नगर प्रभागातील साईसिध्दनगरमधिल नागरिकांची गेली सहा महिन्यांपासून दूषित पाण्याची तक्रार होती.
वाॅशआऊट ,अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी, प्लंबर ने दुरूस्तीचे काम केले.
पण डोळ्यांना मात्र ते पाणी पिवळसर आणि दुर्गंधी असणारे होते .
शिवाय सतरा वर्षांपूर्वी ची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या विचारात घेता त्या ठिकाणी त्यावेळची पाण्याची लाईन विचारात घेता तेथे पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत होता
साईसिद्धनगरवासीयांनी लेखी निवेदन नगरसेविका यांना दिले
अनेक प्रयत्न करूनही दूषित पाणी येण्याचे बंद झाले नाही.
नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर यामुळे आला होता .
अखेर पाणीपुरवठा विभागाला ही लाईन सतरा वर्षांपूर्वीची असून याठिकाणी नवीन पाण्याची लाईन टाकून देण्यासंदर्भात नगरसेविका प्रियांका बारसे यांनी प्रस्ताव दिला .
पाणिपुरवठा विभागाचे अभियंते जगतापसर व वहीनकर सर यांनी समक्ष या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रोजेक्ट मॅनेजर ,अमृतयोजना यांना त्वरीत येथे नविनलाईन टाकण्याचे कामास सुरूवात करण्याचे लेखी आदेश आज दिला.
पुढील आठवड्यात साईसिद्धनगर मध्ये पाण्याची नविन लाईन टाकण्याचे काम चालु होईल अशी माहीती नगरसेविका प्रियांका बारसे यांनी दिली.