शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
सध्या कोरोना महामारी मुळे आपल्या देशाला तसेच राज्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहेत तसेच शासनाने लॉक डाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर एक सामाजिक दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्ष शाम जगताप यांनी आपला वाढदिवस साजरा न करता या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
कोरोना परिस्थितीचा विचार करून पिंपळे गुरव येथील शाम जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा यांच्या वतीने वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील ,मा.विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक नाना काटे ,विद्यमान नगरसेवक मयूर कलाटे ,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे ,प्रशांत देवकाते ,उपाध्यक्ष तानाजी ऊर्फ पिंटू भाऊ जवळकर ,युवा नेते अमर आदीयाल,अक्षय जगताप, संकेत विधाते,अभीषेक काशीद, अमित जगताप ,उपस्थित होते