शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
मुंबई, पुणे मनपाच्या धर्तीवर ड्राईव्ह इन व्हँक्सीन व व्हिल ऑन व्हँक्सीन चालू कार अशी मागणी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी मनपा आयुक्तां कडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी मनपाकडून शासकीय नियमाप्रमाणे नागरीकांना लस देण्याची व्यवस्था शहरात सुरु करण्यात आलेली आहे.शहरात वयोवृध्द नागरीक त्याच प्रमाणे विकलांग नागरीकांना लसीकरण केंद्रावर येऊन लस घेणे त्रासदायक होत आहे. या नागरीकांना रांगेत थांबणे शक्य होत नसल्यामुळे लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत, परीणामी वयोवृध्द व विकलांग नागरीक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मुंबई मनपाच्या धर्तीवर वयोवृध्द नागरीकांसाठी ड्राईव्ह इन व्हँक्सीन तसेच विकलांग नागरीकांना व्हिल ऑन व्हँक्सीन करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे या नागरीकांचेसुध्दा कोरोना लसीकरण होईल.तरी मुंबई, पुणे मनपाच्या धर्तीवर वयोवृध्द नागरीकांसाठी ड्राईव्ह इन व विकलांग नागरीकांसाठी व्हिल ऑन व्हँक्सीन चालू करण्यात यावे.अशी मागणी राजू मिसाळ यांनी केली आहे.