पुणे, दि. 28 : पुणे विभागातील 14 लाख 8 हजार 917 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 31 हजार 853 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 92 हजार 743 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 30 हजार 193 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.97 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 5 हजार 646 रुग्णांपैकी 9 लाख 56 हजार 857 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.15 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 58 हजार 26 रुग्णांपैकी 1 लाख 31 हजार 991 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 61 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 48 हजार 722 रुग्णांपैकी 1 लाख 34 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 143 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 14 हजार 218 रुग्णांपैकी 98 हजार 128 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 789 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 5 हजार 241 रुग्णांपैकी 87 हजार 241 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 461 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 8 हजार 750 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 317, सातारा जिल्ह्यात 2 हजार 536, सोलापूर जिल्ह्यात 940, सांगली जिल्ह्यात 1 हजार 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 947 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 10 हजार 544 आहे. पुणे जिल्हयामध्ये 5 हजार 139, सातारा जिल्हयामध्ये 970, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 744, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 62 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 629 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 26 लाख 185, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 23 हजार 174, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 31 हजार 988, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 90 हजार 410 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 53 हजार 461 नागरिकांचा समावेश आहे.