शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या लसीकरण केंद्र वर होणारी गर्दी आणि नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे .
लसीकरणाबाबत सावळागोंधळ सुरू असून अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या व लसीकरण केंद्राची संख्या यांचे प्रमाण व्यस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रत्येक प्रभाग निहाय एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र सुरू केल्यास एका प्रभागात चार लसीकरण चालू होतील सध्या कोरोना चा संसर्ग वाढू लागल्याने लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे त्यातच आता विविध आस्थापना शासकीय कार्यालय यामधील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे
काहीवेळा केंद्रावर लस नसल्याने किंवा मर्यादित साठा असल्याने अनेक नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करून लस न घेता मागे फिरावे लागत आहे त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तसेच लसीकरणासाठी होणारी गर्दी यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहता नागरिक खाजगी रुग्णालयाकडे वळतील त्यामुळे खाजगी रुग्णालयांना फायदा होईल त्यामुळे प्रशासनाने लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच येत्या काही दिवसात 18 ते 45 वयोगटातील नागरिकां चे लसीकरण सुरू आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर व्यापकता वाढणार आहे हे पाहता लसीच्या साठे ची पुरेशी उपलब्धता करून लसीकरण केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड शहरात एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे