शबनम न्यूज / प्रतिनिधी
पारनेर विधानसभेचे आमदार निलेशजी लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर येथे मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी सदिच्छा भेट दिली.आतापर्यंत हजारो रुग्ण कोरोनावर मात करुन या कोविड सेंटर मधून घरी गेले आहेत.
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत आमदार निलेश लंके करीत असलेल्या कामावर संपूर्ण राज्य व देशातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशासह जगातून देखील अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत करीत आहेत.
या वेळी आमदार सुनील शेळके यांनी येथील सुविधांचीमाहिती घेतली , रुग्णांशी चर्चा केली , व आमदार निलेशलंके यांच्याकार्या चे कौतुक करीत आपल्या प्रतिक्रिया देतांना सांगितले कि “जनतेची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्याच्या मागे जनता नेहमी उभी राहते.जनता तुम्हाला कधीच विसरत नाही. नेते, तुम्ही या संकटकाळात जनतेची जी मनोभावे सेवा करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून आम्हांला तुमचा अभिमान आहे.”