शबनम न्यूज / प्रतिनिधी
सभामंडप तसेच व्यासपीठाच्या कामाचे भूमिपूजन नायगाव (ता. हवेली) येथील सिद्धार्थनगर मध्ये शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ॲड् अशोकबापू पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कोरोना योग्य त्या उपचारांनी बरा होऊ शकतो असा आत्मविश्वास आमदार ॲड् अशोकबापू पवार यांनी उपस्थितांना दिला. ग्रामपंचायत रस्ते, सभामंडप, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, वीज ट्रान्सफॉर्मर तसेच इतर सर्व कामांसाठी आपण मदत करत आहोत, नागरिकांनी देखील मोकळ्या मनाने संपर्क करावा, असे आवाहन आमदार ॲड् अशोकबापू पवार यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच श्री. गणेश गुलाब चौधरी, नायगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुनिल बजरंग हगवणे, व्हाईस चेअरमन श्री. संजय दत्तात्रय कामठे व श्री काळभैवरनाथ प्रासादिक दिंडीचे उपाध्यक्ष श्री. सुभाष किसन हगवणे, खजिनदार श्री. बाळासाहेब आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते, या सर्व मान्यवरांचा नव नियुक्तीसाठी अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.