शबनम न्यूज / प्रतिनिधी
मुंबई -दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील महिला आरोपी नामे रीटा सिंग ही गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस ठाण्यात हजर न राहता स्वतःच्या राहते घर सोडून अज्ञात ठिकाणी आपले ओळख लपवून राहत होती गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संतोष राम प्रताप सिंग उर्फ बबलू ठाकूर यांची पत्नी रिठा सींग ही रायगड येथे लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी नवी मुंबई या ठिकाणी ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर रिटा संतोष कुमार सिंग हिला महिला पोलिसांच्या ताब्यात देऊन दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे चौकशीकामी घेऊन येत असताना दादर रेल्वे पोलीस ठाण्यात समोरील महिलांच्या डब्यात जवळून पोलिस पथक आरोपी महिलेसह पोलीस ठाण्यात येत असताना तिने महिला पोलीस अंमलदार यांचे हाताला अचानक पणे झटका देऊन दादर रेल्वे स्टेशन प्लाट नंबर चार वर येत असल्याच्या डाऊन टिटवाळा जलद ती 19 11 12 या चालू लोकल गाडीच्या समोर उडी मारून विरुद्ध दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला
सदर वेळी तपास पथकातील पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक घनवट यांनी लागलीच प्रसंगावधान राखून महिला आरोपीचा जीव वाचविण्या साठी साठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः जीव धोक्यात घालून येणाऱ्या लोकल गाडीची गती न पाहता रेल्वे ट्रॅक मध्ये उडी मारून आरोपी महिलेला रेल्वे मार्गाच्या बाजूस बाहेर ओढले व आरोपी महिलेचा जीव वाचविला
सदर पळून जाणारी महिला आरोपी हिला वाचविताना रेल्वे मार्गात चालू लोकल गाडीच्या समोर उडी मारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन धोंडीबा घनवट यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली यामध्ये महिला आरोपीस मुका मार लागला असून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले तिला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही ती पूर्णपणे सुरक्षित आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन धोंडीबा घनवट यांनी सदर आरोपी महिलेला वाचविण्या साठी आपल्या जीवाची व कोणत्याही बाबींची तमा न बाळगता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी कामगिरी चे पोलिस दलातून व जनमानसातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांना द रियल हिरो असे म्हटले जात आहे