शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच गवळी नगर येथे सखुबाई गवळी उद्यान कॉर्नर आळंदी रोड ते दिघी रोड असा १२ मीटर रुंदी व ५००मीटर लांबी असलेल्या काँक्रिटीकरण कामास सुरुवात. तप्तुर्वी या ठिकाणी स्ट्राॅमवॉटर लाईनकामास सुरुवात.झाली असून नगरसेविका प्रियांका बारसे यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आली
भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच गवळी नगर येथे सखुबाई गवळी उद्यान ते विरंगुळा केंद्राकडे नाल्याचा प्रवाह आहे .संभाजीनगर येथे नाला ओपन असल्यामुळे नागरिक या ठिकाणी राडारोडा कचरा टाकतात आणि बऱ्याच वेळा ही लाईन चोकअप होते. प्रियदर्शनी शाळेच्या मागच्या परीसरातुन हा नाला घराच्या पायाखालून वाहतो.येथे राहणाऱ्या नागरिकांना व राधानगरी मधील नागरिकांना देखील पावसाळ्यात या ठिकाणी भयंकर त्रास सहन करावा लागतो. गुडघा गुडघाभर पाणी या ठिकाणी साठते. लोकांच्या घरात पाणी शिरते .त्यामुळे स्ट्राॅमवॉटर लाईनची दिशा बदलणे गरजेचे होते आणि हे लक्षात घेऊनच सखुबाई उद्यानाच्या मागच्या बाजूने नूरमोहल्याच्या मुख्य रस्त्याने हा नाला नेण्याचे काम अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सुरू झालेले आहे.
यामुळे प्रियदर्शनीशाळेचे मागिल नागरिकांची व राधानगरी मधील नागरिकांची या त्रासापासून सुटका होईल हे लक्षात घेऊनच स्ट्राॅम वॉटर लाईनचे काम सुरू करण्यात आलेले आहे .
काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरण याच्या कामास सुरुवात होणार आहे .या रस्त्यावर रस्ता खचण्याचे व अपघात होण्याचे प्रमाण वारंवार घडत होते.
प्रभाग क्रमांक पाच हा भोसरी गावातील पहिलाच प्रभाग असून या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्याचा रस्ता मान आम्हाला मिळत आहे याचे आम्हा सर्वच नगरसेवकांना समाधान आहे .
त्याच प्रमाणे भविष्याचा विचार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५-५ फुटाचे पदपथ उभारले जाणार आहे .जेणेकरून याठिकाणी प्रियदर्शनी शाळा, आदर्श शाळा ,श्रमजीवी शाळा रयत शिक्षण संस्था,ज्ञानसागर विद्यालय अशा खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जाणारा विद्यार्थी व पालकवर्ग यांना त्रास होऊ नये आणि कोणताही अपघात घडू नये हा विचार करून हे पदपथ उभारले जाणार आहेत .
या संपूर्ण कामाला महानगरपालिकेकडून ४ कोटी २४ लाखाची तरतूद मंजूर झालेली आहे.
तसेच आळंदी आणि दिघी रस्त्याला जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने आळंदी रस्त्यावरून दिघीरस्त्याला येणाऱ्या वाहनांची नागरिकांची या रस्त्याला नेहमीच पसंती असते आणि आता हा स्वप्नवत असा कॉंक्रिटीकरण याचा रस्ता झाल्याने नागरिक या ठिकाणी आनंद व्यक्त करीत आहेत असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी सांगितले.
हे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार आहेत तरी नागरिकांनी सहकार्य करण्यासाठी प्रियांका बारसे यांनी सर्वांना आवाहन केले आहे.