शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
केंद्रातील मोदी शासनास 7 वर्षे पुर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. असे आरोप करीत मोदी सरकाच्या निषेध करण्यासाठी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार तसेच प्रदेशाध्यक्ष बदरूज्जमा यांच्या मार्गदर्शनाने . 30 मे 2021 रोजी पिंपरी येथील संपर्क कार्यलया समोर काळ्या फिती बांधून तसेच मोदी सरकारच्या अपयशच्या मुद्द्यांचे फलक हातात घेवून निदर्शने करण्यात आली
सात वर्षात ना केला विकास, मोदीनी केला देश भकास
- कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, कोरोनाच्या दुस-या लाटेला रोखण्यात अपयश, लसीकरणात आलेले अपयश.
- पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई
- देशाचर ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेली देशाची दुर्दशा.
- संपूर्ण देशातील वाढती बेरोजगारी.
- शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे
- आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की
- मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला
निदर्शनात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. यावेळी आयु. सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघिटत कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, सौ. शितलताई कोतवाल समन्वयक महाराष्ट्र प्रदेश घरेलु महिला कामगार काँग्रेस, आयु प्रदिप कांबळे कार्याध्यक्ष भीमशक्ती संघटना, मोहन उनवणे जिल्हा समन्वयक सोशल मिडीया विभाग, आयु. अशोक गायकवाड चेअरमन फुले, शाहु, आंबेडकर हौसिंग सोसायटी, आशुतोष चंदनशिवे पिंपरी विधानसभा अध्यक्ष, देवीदास साळवे, दिलीप गायकवाड, किशोर भाउ, अर्चना कांबळे, सोनाली म्हसकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.