भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
केंद्र सरकारने पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात दि. 30 मे रोजी आपली यशस्वी ७ वर्ष पूर्ण करत आहेत. या यशस्वी वाटचाली निमित्त “सेवा ही संघटन” या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचीत जाती मोर्चा पिंपरी चिंचवड च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना काळात रुग्णांना निरंतर सेवा देणाऱ्या चिंचवड येथील आशाकिरण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, कर्मचारी यांचा भाजपा चे प्रदेश सचिव श्री अमित गोरखे यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मदर तेरेसा आश्रम येथील अनाथ ज्येष्ठांना फळ वाटप व अन्नदान वाटप करण्यात आले, यावेळी भाजपा अनुसूचीत मोर्चा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष विजय वाघमारे, सरचिटणीस यशवंत दनाने, सचिव संतोष रनसिंग , चिटणीस नेताजी शिंदे, वसंत दोषी,अजिंक्य गोळे, सुनील रनसिंग,दिनेश पाटील,रवि खांडे,भानुदास नेटके, नरेन्द्र रजपूत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.