श्री. बन्सी गंगाराम आटवे, क्रीडाशिक्षक, (एस.एसी.डी.एड.बी.पी.एड.सी.पी.एड.)
हमे तो मौत मिली थी,
कबड्डी ने जिंदा किया ।
उस की देन है जिंदगी,
जीने का जिसने एहसास दिया ।
नि:श्वास झालेले माझे जीवन विश्वास व श्वासयुक्त करीत निर्मात्याच्या कृपेने मी पुन्हा जिवंत झालो. आता मी बोनस आयुष्य जगत आहे. तेही कब्बडी रुपी, देवतेची सेवा करीत मैदानावरील चैतन्यरुपी खेळाडूंच्या पूजनाच्या ध्यास मनी धरूनच !
दिनांक 20 डिसेंबर 2001 रोजी चाकण येथून निमंत्रित कबड्डी सामने खेळून आम्ही परतीचा प्रवास करीत असताना खेळाडूंसह आम्ही बसलेला टेम्पो बिस्किटांचा बॉक्स म्हणावा. तसा गडबडला आणि अपघात झाला. पलटी झालेल्या टेम्पो खाली माझा डावा पाय अडकला. सुदैवाने खेळाडू बचावले. माझ्या पायाला गंभीर दुखापत होती. गॅस गॅंगरीग झाले. पाय वाचवावा की मनुष्य वाचवावा, असा विचार डॉक्टर करीत होते. शेवटी पाय तोडण्याचे निश्चयप्रत्य आले.
कबड्डी व माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न चालविले. महापौर, नगर सदस्य, अतिरिक्त आयुक्त साहेब ,अधिकारी हितचिंतक मित्र आणि डॉक्टर यांच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला प्रयत्नाच्या पराकाष्टेला यश आले. जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे माझ्या पायाची मोठी पायाची सर्जरी झाली. पाय व जीवही वाचला पण मला पायाचे अपंगत्व आले ते कायमचेच. पण..पण मनाचे नव्हे!
म्हणून माझे आयुष्य माझे नसून ते दैवाने चैतन्य रुपी मानवतेची सेवा करण्यासाठी दिलेले बक्षीस आयुष्य आहे. जीवावर बेतलं होतं ते पायावर निभावलं… अनेक दिग्गज कबड्डी व मैदानी चे मार्गदर्शक पुण्यासह महाराष्ट्रात आहेत. त्या अनेक तेजोमय प्रसिद्धीची व लय असणाऱ्या मान्यवरांना नमस्कार करून मी पुढील काळात अपंग पायाचा आधार घेत जे काही मिणमिणत्या मेणबत्ती सारखे काम केले. ते मी आपणासमोर नम्रपणे मांडतो आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा विभागात सेवा करीत असताना राजश्री मोरे हिने 17 वर्षे मुली शालेय राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत सलग तीन वर्षे राष्ट्रीय पदके प्राप्त केली. मानस मोरे याने 57 किलोग्राम वजन गट शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सहभाग नोंदवला. रुक्मिणी लोंढे 600 मीटर धावणे क्रीडा प्रकारात शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. हुसेन मुल्ला हिने 300 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात मैदानी संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. भारतीय राज्य राहुल गोंड, इंद्रायणी यादव अशा अनेक राज्यस्तरीय मैदानी खेळाडूंना मार्गदर्शन केले. याचा मला सार्थ अभिमान आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात सुवर्णमय पान म्हणजे, अर्थात सन 2018 -19 ला बारामती येथे झालेल्या 14 वर्ष वयोगट मुली शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत माझ्या पिंपरी-चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव ने राज्य अजिंक्यपद मिळविले. सन 2019 – 20 ला मुंबई, वर्सोवा येथे झालेल्या शालेय 17 वर्ष मुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत माझ्या विद्यालयाने राज्य विजेते होण्याची पुनरावृत्ती केली. या प्रचंड मोठ्या यशाची घोडदौड करणारा अजिंक्य रथ दुर्दैवाने या वर्षी कोरोना आणि थोडासा थांबवला हॅट्रिक करू दिली नाही..!
सन 2019-20 ला शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राने कांस्यपदक पटकाविले. त्या संघात माझ्या संघातील मनीषा राठोड व भूमिका गोरे यांनी भरीव कामगिरी केली त्या वर्षीचा उत्कृष्ट चढाईपट्टू चा राष्ट्रीय मान मनीषाने मिळविला.
आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे मला भाग्य मिळाले. मोबीन शेख, संतोष चौधरी, आकांक्षा दुधाळ, रूपाली डोंगरे, श्रावणी सावंत, पूजा जगताप असे अनेक खेळाडू घडत आहेत. तसेच शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे प्रावीण्याची प्रमाणपत्रे तेजल महाजन, कोमल राठोड, चांदणी गायकवाड, पूजा तेलंग, सविता गवई, विद्या गायकवाड, निकिता माळी, शिशा वस्ताद, अमृता भागवत, सुवर्णा कराळे ,सलोनी सरदार, दियाश्री मांजरे, सखूबाई जाधव, कीर्ती कडगं यांनी मिळविली आहे.
पिंपरी चिंचवड मनपा चे क्रीडा कला विकास प्रकल्प हा माझ्या महानगरपालिकेचा कबड्डी संघ आता पुन्हा चांगले प्रदर्शन करू लागला आहे. सन 2019 – 20 चा किशोरी गट विजयाच्या जिल्ह्याचा बहुमान माझा या संघाने मिळविला आहे. माझा संघ माझा कुटुंब आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने माझ्या कबड्डी संघाला कबड्डीची मॅट दिवाळी भेट म्हणून दिली आहे. मला माझे अधिकारी उपाआयुक्त श्री संदिप खोत साहेब, श्री.रज्जाक पानसरेसाहेब माझ्या कार्यास माझ्या पाठिशी ठाम उभे असतात. स्थानिक नगर सदस्य, अधिकारी, माझे मुख्याध्यापक यांचे मला मोलाचे सहकार्य लाभते. सुंदर अध्यावत कबड्डीचे मैदान सेमिनार हॉल, चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था अशा अद्ययावत सुविधा त्यांच्या सहकार्याने मिळविल्या आहेत. माझ्या पत्नीसह माझे कुटुंबीय या कामी मला सतत सहकार्य करत असतात. कब्बडी संघ चालविताना व सांभाळताना इतर संघटनात ज्या अतोनात अडचणी येतात. त्या मलाही येतात. या आत्तापर्यंतच्या प्रवासात जसे मित्र वाढतात, तसेच शत्रू देखील वाढतात. फोडाफोडी.. निवड..नोकरी.. वगैरे वगैरे …बस चलते रहना है..कारवां बढ़ता जाता है।
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील प्रभाग क्रमांक 23 मधील विद्यमान नगरसेविका व शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे यांच्यासोबतच आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच श्री दत्ता भाऊ झिंजुर्डे, पुणे जिल्हा कबड्डी पंच प्रमुख संदीप पायगुडे सर, सहकार्य वाह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन राजेंद्र आंधेकर, सहकार्य वाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन योगेश यादव, पुणे जिल्हा कबड्डी सदस्य शेखर रावडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कविता रामदास, राजू शिंदे, प्रकाश गाडे या मान्यवरांचे माझ्या नवोदित संघाला मार्गदर्शन मिळते. तसेच माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षक रामेश्वर पवार, सोनाली जाधव, वंदना आहेर, गणेश लिंगडे, अण्णासो वाघोले यांचे नेहमीच सहकार्य लाभते.
राजाभाऊ ढमढेरे सरांचा राजमाता श्री, अनंत शेळके सरांचा सुवर्णयोग, श्री महेंद्र माने सरांचा एमडी, राजेश पाडावी मुंबई यांचा शिवशक्ती .असे कबड्डी संघ आणि त्यांचे कौशल्य पाहिले. म्हणजे मला खुजेपणा येतो आणि… तो दिल्ली दूर हे असे मला वाटते.
मारून जिवंत करणारा, हारून विजयाचा भास देणारा, कबड्डी खेळ आपणास आनंद प्रसिद्धी पैसा सर्व काही देत आहे.आम के आम गुठलियो के दाम.. म्हणून कोरोनाच्या आपत्ती काळात खेळ व खेळाडू जिवंत राहिला पाहिजे. यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शकांचे ऑनलाइन मुलाखती आयोजित करणारे खेळाडूंची हितासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करणारे आपल्या अपंगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्राच्या उज्वल उन्नतीसाठी आपल्या आयुष्याची समिधा समाजहिताच्या अज्ञात अपर्ण करणारे सागर आप्पा खळतकर यांच्या विचारांस हा माझा छोटासा लेख समर्पित!
आतापर्यंतचा माझा जीवन ‘प्रवास’ या शब्द मनामध्ये मांडून आपल्यापर्यंत पोहोचणार या या शब्द प्रभूच्या ऋणातच राहणे मी पसंत करेल…या जीवन प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद…!!