कुदळवाडीत ‘सेवाकार्य दिन’ वृक्षारोपणाने साजरा
शबनम न्यूज / पिंपरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आज (दि. ३० मे) रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने सलग सात वर्ष वेगवेगळ्या पातळीवर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या निमित्त पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा व ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या वतीने कुदळवाडी परिसरात ‘सेवाकार्य दिन’ साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव साजरा न करता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार विविध झाडांची रोपे लावली. तसेच ती जगविण्यासाठीची देखील व्यवस्था करण्यात आली. यावेळी शाम थोरात, पंडित तिवारी, अमर लोंढे, दिपक घन आदी आदींनी परिश्रम घेतले.
याबाबत माहिती देताना दिनेश म्हणाले, भाजप हा सेवाकार्य करणारा पक्ष असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गेल्या सात वर्षापासून ‘सेवा परमधर्म’ या भावनेतून काम करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचा व पंतप्रधान मोदी यांचा आदर्श घेऊन संपूर्ण प्रभागात ‘सेवा हीच संघटना’ हा मूलमंत्र जपत वृक्षारोपणाचे सेवाकार्य हाती घेतले. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटले. वृक्षांच्या कमतरतेमुळे जागतिक हवामान बदलाचे संकट भीषण होत चालले आहे, त्यासाठी वृक्षारोपण हाच त्यावरील उतारा असल्याची प्रभागात जनजागृती करण्यात आली. पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती जनतेला देण्याचा संकल्प केला.