शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस या महामारीने थैमान घातले आहे. आणि त्यातच आपल्या महाराष्ट्रामध्ये याचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. आणि आपल्या या महामारी वर विजय मिळवायचा असेल तर आपला हा युद्ध रणांगणामध्ये नव्हे तर घरात राहून जिंकावे लागणार आहे. म्हणून दिनांक ३१मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरातच साजरी करावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष रामजी कोळेकर यांनी केले आहे.
नाथा कोळेकर, रामभाऊ कोळेकर, राजू कोळेकर, सागर कोळेकर, गोरख थोरात, प्रकाश कोळेकर, दौलत भाना कोळेकर, गंगाराम कोळेकर, धनेश कोळेकर, आप्पा कोळेकर, संजय कोळेकर, भीमा करे, रमेश करे, रामजी कोळेकर, यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. ३१मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरातच साजरे करावा. लॉक डाउन असल्यामुळे आपण सरकारी नियम पाळावा. असे आवाहन हि रामजी कोळेकर यांनी केले आहे.