अगोमोनी प्रभासी संघ यांचा उपक्रम
शबनम न्यूज / पुणे
पुणे जिल्ह्यात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. त्यामुळे अनेकांची रोजी रोटी बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा कठीण काळात अगोमोनी प्रभासी संघ पुणे च्या वतीने आज रविवार दिनांक ३० मे रोजी वडार हैसिग सोसायटी, सेनापती बापट रोड, मॉडेल कॉलनी, रस्ता पेठ, बाणेर पाषाण लिंक रोड, सुस रोड येथे गरीब, गरजू झोपडीत राहणाऱ्या २३५ नागरीकांना आन्यधान्य किट वाटप करण्यात आले. कीट मधे तांदूळ, डाळ, अटा, मसाले, मीठ, तेल, कांदे, बटाटे आदींचा समावेश होता.
अगोमनी प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष राजेश बर्मन उदय माहले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
या वितरण कार्यक्रम प्रसंगी ओगोमनी प्रवासी संघाचे कॅप्टन पी के मुखर्जी, संदीप भट्टाचार्य, डॉ. सिद्धार्थ सरकार, शुंभकर सहाय, अनुपम चक्रवर्ती, विजय लंबे, निरंजन सरकार, महेश भाई, सचिन अंबावने, जयपाल दगडे पाटिल आदी उपस्थित होते.