शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयातील दंतरोग शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांचा ‘डेंटिस्ट ऑफ इयर 2021’ हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (दि. 29 मे) रोजी मुंबई येथे ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील फेमडंट एक्सलन्स डेंटिस्ट्रि ॲवार्ड (Famdent excellence Dentisty Awards) या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांना दंतशास्त्रातील ऑस्कर असेही संबोधले जाते. यामध्ये देशभरातून सुमारे 500 दंत तज्ज्ञ सहभागी झाले होते.
या कार्यक्रमामध्ये डॉ. यशवंत इंगळे यांना डेंटिस्ट ऑफ इयर 2021 हा पुरस्कार जाहिर करण्यात आला. देशभरातील 30 सुप्रसिध्द आणि जेष्ठ तज्ज्ञांनी याचे परिक्षण केले. या कार्यक्रमामध्ये डॉ. सचिन सरोदे यांना बेस्ट अॅकेडेमिक्स इन डेंटिस्ट्रि आणि डॉ. गार्गी सरोदे यांना 45 वर्षाखालील झोन ‘अ’ मधील आऊट स्टॅडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार घोषित करण्यात आला.
या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन फेमडेंट इंडियाचे अध्यक्ष डॉ अनिल अरोरा, डॉ. ज्योतिका अरोरा, डॉ. ए. कुमारस्वामी, डॉ. समीरा शेख यांनी केले.