शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस योगेश मोरे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता गरिबांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम आकुर्डी खंडोबा माळ येथे घेतला.
सध्या कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण देशात व आपल्या राज्यात थैमान घातले आहे. या कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले. या काळात अनेकांना एक वेळचे जेवणही मिळणे कठीण झाले .अशा कठीण परिस्थितीची जाणीव लक्षात घेता योगेश मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील नागरिकांना एक हात मदतीचा एक घास माणुसकीचा या उपक्रमांतर्गत अन्नदान केले.
Advertisement
या वेळी सौ सारिका ताई पवार, डॉ विनय शेट्टी ,स्वप्नील सरातकर तसेच भाग्येश मोरे,अक्षय मोरे तसेच जगदीश पवार आदि युवा टीम उपस्थित होते.