शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
केंद्रातील मोदी सरकारने सात वर्षात काय केले? या विरोधी पक्षांच्या प्रश्नाला संजीवनी पांडे (महिला प्रदेशाध्यक्ष उत्तर भारतीय सेल ) यांनी उत्तर दिले आहे आज केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाले हे सात वर्ष साजरे करत असताना भाजप वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत परंतु या सात वर्षात विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी सरकारने काय केले असे प्रश्न विचारले आहे या पार्श्वभूमीवर संजीवनी पांडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की सात वर्षांत काय झाले हे एका वाक्यात सांगायचे तर देश ‘इंडिया’ से ‘आत्मनिर्भर भारत’ बनला असे म्हणता येईल.
करोना महामारी च्या ह्या जागतिक संकटा मुळे नागरिक शारिरीक ,आर्थिक विवंचनेत जरूर सापडला आहे पण मानसिक स्तरावर अधिक सक्षम होऊन देशाचा प्रत्येक नागरिक आज स्वतः ला आशावादी आणि गौरवान्वित समजत आहे.
सात वर्षांत स्वतः च्या वोट बँक साठी जे जे घोंगडे भिजत घातले होते ,ते ते पिळून सुकवून वाळवून काढले गेले.
मग ते काश्मीर मधील धारा 370 असो, भव्य राम मंदिर निर्माण असो, तीन तलाक चा अल्प संख्यक महिला भगिनीं ना न्याय असो, किंवा सवर्ण समुदायाला आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण असो. असे धडाडीचे निर्णय सात वर्षांत झाले. ह्या बरोबरच सर्जिकल स्ट्राईक, हवाई स्ट्राईक सारख्या मोहिमां नी सैन्याचे मनोधर्य उभारणी जागतिक स्तरावर भारताच्या संरक्षण दलाची सक्षम छवी उभारणी होय.
जन धन खात्या मार्फत प्रत्यक्ष लाभार्थ्यां पर्यन्त पोहोचणे असो, वन नेशन वन टॅक्स, वन रॅक वन पेंशन हे सर्व when there is a will, there is a way चे द्योतक आहे.
ह्या शिवाय 100 वर्षा तून एखाद्या वेळी येणार्या अश्या जागतिक संकटात ही आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एन्टोनी ब्लिंकन यानी भारता बद्दल काढलेले गौरवपूर्ण उद्गार “करोना च्या प्रारंभिक काळात भारताने अमेरिकेला साथ दिली, ते अमेरिका कधीही विसरणार नाही, व आता अमेरिकेची जबाबदारी आहे की भारताला कसलीही गरज लागेल तेव्हा आम्ही भरताच्या पाठीशी असेल ” हे विसरून चालणार नाही.
त्या शिवाय ऑक्सिजन ट्रेन, हवाई मार्गाने जलद गतीने इंजेक्शन्स व इतर औषधसामुग्री चे डिस्ट्रीब्यूशन असो हे सर्व इतिहासात उल्लेखले जाईल.
त्यातून आज चे कोवीङ मुळे निराधार झालेल्या बालकां साठी, परिवारान साठी झालेले निर्णय तर मंदिरा वर कळस म्हटले जातील.
अजून ही बरेच काही आहे पण एक गोष्ट,
हे सर्व हेच दर्शवते की राजकिय इच्छा असेल तर काय नाही होऊ शकत.
- संजीवनी पांडे (महिला प्रदेशाध्यक्ष उत्तर भारतीय सेल )