शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे , विकास नगर परिसरात पाण्याची टंचाई भासत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर या परिसरातील शिवसेना युवासेना चे राजेंद्र तरस यांच्या पुढाकाराने राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन वतीने विकास नगर येथील सोसायटींना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
यावेळी राजेंद्र तरस यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची पातळी खाली गेली असल्याने अनेक सोसायट्यांना पाण्याची अडचण निर्माण होत आहे त्या कारणाने आपण आपल्या फाउंडेशन वतीने मोफत टँकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही सुविधा नागरिकांना मोफत सुरू करण्यात आली असून पाण्यासारखे पुण्य नाही या तत्त्वानुसार आपण मोफत पाणीपुरवठा करीत आहोत. त्यांच्या या सामाजिक कार्याची संपूर्ण किवळे व विकास नगर मध्ये चर्चा सुरू असून नागरिक राजेंद्र तरस यांचे आभार व्यक्त करीत आहेत