शबनम न्युज / मुंबई
भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा भाजप नेते प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
Advertisement
मंडल आयोग आल्यानंतर भाजपवाले त्याला विरोध करत होते ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवतात, तर कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात. ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.