शबनम न्युज / पुणे
कोरोणा सारख्या भयंकर महामारीमध्ये असंख्य कुटुंबांचे रोजगार बंद झाले व दैनंदीन जिवन विस्कळीत झाले, त्यातच या समाजामध्ये एक घटक असा आहे जो बर्याच मदतींपासुन वंचीत आहे. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा द्रुष्टीकोन पण वेगळा आहे. तो घटक म्हणजे देवदासी स्त्रीया.
दि.२९ मे रोजी बुधवार पेठ रेड अलर्ट क्षेत्रात आयक्यु मीडिया आणि मल्टी सर्व्हिसेस यांच्याकडुन जवळपास 500 + मुले व स्त्रियांसाठी 300 पेक्षा जास्त नवीन टी-शर्ट्स, पेपर बोटचा ज्युस, गणेश भेळ पॅकेट्स, येल्लो डायमंड चीप्स, चीज बॉल आणि कॉटन मास्कचे वाटप करण्यात आले. या कार्यात आरएमसी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांचे सहकार्य मिळाले.
तसेच गणेश भेल, चीज बॉल आणि कॉटन मास्क मित्र व सामाजिक कार्यकर्ता नीलेश भूताडा यांच्या कडुन मिळाले. भेटवस्तू साठी आरएमसी टीम व संजय सिन्हा यांचे सहकार्य लाभले. या कार्यासाठी समन्वय व व्यवस्थेसाठी पीएसआय तेजस्वी पाटील (शुक्रवा्र पेठ, पोलिस चौकी) आणि समाजसेविक अलका गुंजन यांनी मदत केली.
सामाजिक कार्यात पुढाकार घ्या अशी गरज असलेले अनेक कुटुंब मदती पासुन वंचीत आहेत त्यांच्या मदतकार्यात सामील व्हा असे आवाहन ईश्वर बजाजआयक्यु मीडिया आणि मल्टी सर्व्हिसेस यांच्याकडुन करण्यात आले आहे.