शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वय वर्षे ४५ पुढील नागरिकांसाठी ६५ केंद्रावर लसीकरण चालू आहे. या सर्व लसीकरण केंद्रावर वय वर्षे ४५ पुढील (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाने दिलेल्या मर्यादेमुळे अनेक ४५ वर्ष पुढील नागरिकांसाठी लस न घेता परत जात आहे.
यामुळे शहरात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी १ जुन पासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरात वय वर्षे १८ पुढील नागरिकांचे लसीकरण चालू करण्यात यावे.अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते , नगर सेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केली आहे.
ऑनलाइन नोंदणी न करता केंद्रावरच नोंदणी करून लसीकरण करण्यात यावे.असे हि नाना काटे यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात युवकांची संख्या जास्त असून अनेक महाविद्यालय, कंपनी, खासगी ऑफिस इत्यादी ठिकाणी काही काम करणाऱ्या युवकांची संख्या जास्त असून करोनाच्या रोगापासून वाचण्यासाठी या गटातील लसीकरण होणे गरजेचे आहे.आपल्या कडील लसीची उपलब्धता व नियोजन बघून आपल्या अधिकारात निर्णय घेवून १ जून २०२१ पासून शहरात वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण चालू करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे,