शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना पाश्र्वभूमीवर सध्या क्षेत्रिय कार्यालयांच्या मासिक सभा होत नाहीत.त्यामुळे अधिका-यांच्या गाठीभेटी होत नाही.
तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आज ई क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंते घुबे साहेब ,उपअभियंता शिनकर मॅडम तसेच कनिष्ठ अभियंते पांचाळ सर यांची स्वतंत्र बैठक घेतली.
या बैठकीत नगरसेविका बारसे यांनी गवळीनगर प्रभागातील स्थापत्य विषयक कामांचा कामांना गती देण्याबाबत सूचना केल्या .
काँक्रिटीकरण,डांबरीकरण,पेविंग ब्लॉक, स्ट्राॅम वॉटर लाईन स्वच्छ करणे याबाबत नागरिकांकडून वारंवार विचारणा होत आहे .
अशा वेळी मे महिना संपत संपलेला असताना व पावसाळा तोंडावर आलेला असताना काही काम करणं खूप गरजेचं असल्याचं बारसे यांनी निदर्शनास आणुन दिले.
विशिष्ट परिसरातील काम करणे गरजेचे आहे ते नावानिशी आणि कामाचं स्वरूप लेखी स्वरूपात बारसे यांनी अभियंते पांचाळ यांना दिले .
घुबे साहेबांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.