शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्यामुळे गरीब कुटुंबातील आई-वडिलांना आपल्या मुलीचा योग्य प्रकारे उपचार करून सुखरूप मिळाली. त्याचे झाले असे की, परवा रात्री संध्याकाळी सात वाजता जितेंद्र ननावरे यांचे मित्र नगरसेवक निलेश बारणे यांचा फोन आला. डी वाय पाटील हॉस्पिटल ला एक बारा वर्षाच्या मुलीला आणले आहे. पण ऍडमिट करून घेत नाहीत त्यांना मदत करावी. तातडीने जितेंद्र ननावरे व त्यांचे सहकारी रियाज हे डी वाय पाटील हॉस्पिटल येथे गेले असता त्या ठिकाणी समजले की, त्या मुलीला गेल्या पाच दिवसापासून मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला आहे. बार्शी येथे आयसीयूमध्ये ऍडमिट असताना खर्च परवडत नसल्याने तेथील डॉक्टरांनी शासकीय हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा, म्हणून नातेवाईकांनी सांगितले. त्यावर त्यांनी ॲम्बुलन्स मधून बार्शी येथून पुणे येथे सर्व शासकीय रुग्णालय पालथी घातली. पण covid-19 मुळे कोठेही जागा मिळाली नाही. शेवटी डी वाय पाटील हॉस्पिटल येथे त्या मुलीला घेऊन कुटुंब आले असता, तेथे त्यांना कोणीही ॲडमिट करून घेण्यास तयार नव्हते. या अशा कठीण प्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या विनंतीवरून या बारा वर्षाच्या मुलीला ॲडमिट करून घेतले.
आई-वडील हतबल होऊन बसले होते. मुलीला कधीही ऑपरेशनची गरज होती. याबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची जितेंद्र ननावरे यांनी चर्चा करून विनंती केली. व सदर मुलीला ऍडमिट करून घेतले. सदर मुलीवर योग्य उपचार होऊन सदर मुलगी ही आता सुखरूप बरी झाली आहे. आता ती बोलायला ही लागली आहे. जेव्हा पुण्यात तिचे आई वडील तिला घेऊन आले होते त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. जितेंद्र ननावरे यांच्या प्रयत्नांमुळेच आई वडिलांना त्यांची मुलगी योग्य उपचारानंतर सुखरूप मिळाली.