शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळलेली असताना देखील विविध महाविद्यालये विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासंबधी तगादा लावत असल्या कारणाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पिंपरी-चिंचवड भागांमधील सर्व महाविद्यालयांना निवेदन देऊन विद्यार्थी प्रश्नांचे निराकरण राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने यश साने (अध्यक्ष: राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर) यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे
यश दत्ताकाका साने (अध्यक्ष: राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर), सोमनाथ राजेंद्र लोहार (प्रदेश सचिव:राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस,व्यवस्थापन) तसेच विविध राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांच्या तर्फे राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस तर्फे मागणी करण्यात आली कि, कोरोनाच्या महामारीमुळे ब-याच पालकांचे व्यवसाय, नोक-या तसेच उदरनिर्वाहाची साधणे पुर्णतः किंवा अंशतः बंद झाली आहेत. तरी अनपेक्षीत आलेल्या संकटामुळे आपण कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क बाबत सक्ती किंवा तकादा लावु नये. जेवढी विद्यार्थ्यांना शक्य आहे तेवढे शुल्क भरुन परिक्षेला बसु द्यावे.या आशय चे पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. डी वाय पाटील, आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाताल व्यवस्थापन समितीशी चर्चा करून निवेदन देण्यात आले
यावेळी महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकार्यांना देखील सकारात्मकता दर्शवत सकारात्मक निर्णय घेऊन यापुढे एकाही विद्यार्थ्याला तशी सक्ती किंवा तगादा लावला जाणार नाही अशे आश्वासन देण्यात आले. हा निर्णय ऐकून विद्यार्थी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.