पुणे, दि. 31 : पुणे विभागातील 14 लाख 39 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 57 हजार 57 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 86 हजार 525 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 30 हजार 896 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.98 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.46 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 12 हजार 721 रुग्णांपैकी 9 लाख 67 हजार 776 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 28 हजार 223 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.56 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 463 रुग्णांपैकी 1 लाख 37 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 661 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 150 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 51 हजार 137 रुग्णांपैकी 1 लाख 40 हजार 83 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 103 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 951 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 17 हजार 386 रुग्णांपैकी 1 लाख 1 हजार 880 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 105 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 11 हजार 350 रुग्णांपैकी 92 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 433 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 672 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 7 हजार 350 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 224, सातारा जिल्ह्यात 1 हजार 751, सोलापूर जिल्ह्यात 744, सांगली जिल्ह्यात 872 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 759 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 10 हजार 791 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 822, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 243, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 875, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 292 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 559 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 26 लाख 59 हजार 766, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 34 हजार 144, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 51 हजार 565, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 96 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 60 हजार 793 नागरिकांचा समावेश आहे.