शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात आज २४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे बऱ्याच दिवसातून हि रुग्णांची कमी येणारी संख्या असून शहरवासीयां साठी दिलासादायक आहे. तसेच उद्या पासून अत्यवश्यक सेवा असणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार शहरात आज पर्यंत एकूण करोना बाधित रुग्ण २,५०,३९९ झाले आहे. आज ३२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, आज पर्यंत एकूण २,४१,२२८ करोना मुक्त झाले आहे. तसेच आज पर्यंत शहरातील एकूण ४,०६४ जणांचा कोरोना मुले मृत्यू झाला आहे.आज दिवसभरात ३० जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे
Advertisement