कार्ला – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा सात वर्षे यशस्वी पुर्ण झाल्याबद्दल सेवा कार्यदिन व सेवा सप्ताह दिनाचे औचित्य साधत मावळ तालुका महिला आघाडी भारतीय जनता पार्टी च्या वतीने कोरोना महामारीशी दोन हात करत रूग्ण सेवा करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथिल डॉक्टर, आशास्वयंसेविका व आरोग्यसेविका यांचा साडी चोळी तर रुग्णवाहिका गाडी चालक व सर्व आरोग्य कर्मचारी यांंचा देखील प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच चिक्की, मास्क शिल्डचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे,पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडारे, महाराष्ट्र प्रदेश युवामोर्चा सचिव जिंतेद्र बोत्रे,मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, मावळ महिला आघाडी अध्यक्षा सायली बोंत्रे,मावळ भाजपा उपाध्यक्ष प्रदिप हुलावळे, आरोग्य अधिकारी भारती पोळ, सीमा आहेर, वैशाली ढोरे,अंजली कडू,रोहिणी गाडे,ज्योती काटकर,अश्विनी साठे,आशा जाधव,वैशाली घारे,सपना देशमुख,शिल्पा दळवी विकास लिंभोरे,सागर शिंदे,सुनिल चव्हाण, शेखर दळवी,दत्तात्रय पडवळ,केदार भेगडे,लतिफ शेख,सदाशिव बांगर,संतोष दळवी,नवनाथ कडु आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र सचिव जितेंद्र बोत्रे यांनी सुत्रसंचालन
सुमित्रा जाधव तर राज्यमंत्री संजय भेगडे,गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे रविंद्र भेगडे,सायली बोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ भारती पोळ यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी होत असलेल्या सहकार्य बदल दानशूर व्यक्ती समाजसेवकांचे आभार मानले.