शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्रमांक 23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दिनांक 3 जून 2021 रोजी शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
दिनांक 3 जून 2021 रोजी मनपा मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 4 जून 2021 रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.
तरी नागरिकांनी मनपा कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन ही मनपा वतीने करण्यात आले आहे.