खासदार श्रीरंग बारणे यांनी केली कामाची पाहणी
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव डांगे चौक येथे बांधण्यात येत असलेल्या अंडरग्राउंड ग्रेड सेपरेटरचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. काम पूर्ण करण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कामाचा वेग वाढविण्यात यावा. काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने खासदार बारणे यांनी नाराजीही व्यक्त केली.
डांगे चौकातील ग्रेटसेप्रेटरच्या कामाची खासदार बारणे यांनी मंगळवारी (दि.1) पहाणी केली. नगरसेवक निलेश बारणे, महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे ,कनिष्ट अभियंता बाळासाहेब शेटे ,स्तूप कन्सल्टंटचे अमोल गारुळे, टी अँड टी कन्सल्टंटचे भीमाशंकर भोसले उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, भोसरी या भागात राहणारे नागरिक हिंजवडी आयटीपार्क आणि परिसरात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा सर्वात जास्त बस वाहतूक होणारा रोड आहे. नागरिकांची संख्या जास्त असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चौकांमध्ये सिग्नलची वेळ देखील वाढली आहे. डांगे चौकात सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा त्रास होतो. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मी 3 जानेवारी 2017 आणि 1 मार्च 2017 रोजी डांगे चौकात दुसरा उड्डाणपूल, अथवा ग्रेडसेपरेटर बांधण्याबाबत महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या बीआरटी विभागाने डीएफआर रिपोर्ट तयार केला. ट्राफिक आणि वाहतुकीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. त्यात डांगे चौकामध्ये दुस-या उड्डाणपुलाऐवजी अंडरग्राउंड ग्रेड सेपरेटर करण्
महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या अंडरग्राउंड ग्रेड सेपरेटरचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम रेंगाळले आहे. करारनाम्यानुसार एप्रिल महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ते पूर्ण झाले नाही. काम चालू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. डांगे चौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे लोकांना अडचण होत आहे. नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे सेपरेटरचे काम तत्काळ पूर्ण करावे अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या आहेत.