शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने अति वयोवृध्द व दिव्यांग तसेच अंथरुणावरील रुग्णांना त्यांच्या घरी जावुन लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत बिजलीनगर येथील रेल विहार येथील श्री. विष्णू निंबकर (वय- 88)यांचे लसीकरण करण्यात आले.
Advertisement
यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, तालेरा रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरके, डॉ. विद्या फड-मुंढे, डॉ. सीमा बडे-मोराळे उपस्थित होते.