शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 14 लाख 47 हजार 628 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 63 हजार 261 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 84 हजार 575 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 31 हजार 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.99 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 13 हजार 804 रुग्णांपैकी 9 लाख 70 हजार 162 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 26 हजार 867 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.70 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 66 हजार 256 रुग्णांपैकी 1 लाख 39 हजार 446 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 637 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 51 हजार 565 रुग्णांपैकी 1 लाख 41 हजार 468 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 123 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 18 हजार 367 रुग्णांपैकी 1 लाख 3 हजार 10 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 933 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 13 हजार 269 रुग्णांपैकी 93 हजार 542 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 204 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 83, सातारा जिल्ह्यात 1 हजार 793, सोलापूर जिल्ह्यात 428, सांगली जिल्ह्यात 981 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 919 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 7 हजार 992 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 386, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 794, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 385, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 130 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 297 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 26 लाख 79 हजार 439, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 34 हजार 928, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 58 हजार 705, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 3 हजार 53 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 63 हजार 129 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 87 लाख 58 हजार 74 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 63 हजार 261 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.