पुणे – सह दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत, करारनामा ,कुलमुखत्यारपत्र ,बक्षीस पत्र ,वाटप पत्र ,खरेदीखत वगैरे दस्त नोंदणी करण्यास नाकारण्यात येत आहे वास्तविक पाहता असे कोणतेही आदेश नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने दिलेले नसतानाही सह दुय्यम निबंधक हे बेकायदेशीरपणे दस्तनोंदणी करण्यास नकार देत आहेत याबाबत ॲड.बाळासाहेब थोपटे यांनी प्रसिद्धिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 मार्च रोजी नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांना माहिती अधिकाराखाली ॲड.बाळासाहेब थोपटे यांनी लेखी अर्जाद्वारे माहिती मागितली असता असे कोणतेही आदेश साठेखत व मुखत्यारपत्र दस्त नोंदणी न करणेबाबत कोणतेही आदेश या कार्यालयाने दिलेले नाहीअशी माहिती मिळाली आहे ॲड.बाळासाहेब थोपटे यांना मिळालेल्या माहितीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालय साठेखत, करारनामा, कुलमुखत्यारपत्र, बक्षीस पत्र, वाटप पत्र, खरेदी खत वगैरे जास्त नोंदणी करण्यास नागरिकांना नाकारत असून हे बेकायदेशीर पणे दस्त नोंदणीस नकार देत असल्याचे सांगितले आहे.