शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना काळात अतिशय अडचणींचा सामना करावा लागत असल्याने भोसरी चे प्रथम आमदार विलास लांडे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून करावा असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी चे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोना महामारी मुळे देशात तसेच आपल्या राज्यात व आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये थैमान घातले असून या काळात शासनाने लॉक डाउन जाहीर केले या लॉकडाऊन काळात पिंपरी-चिंचवड शहरातील सलून चालक मोठ्या अडचणीत आले दुकाने बंद असल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला उत्पन्नाचे साधन बंद असल्याने सलून चालकांना उपासमारीची वेळ आली या सलून चालकांच्या कुटुंबाला मदतीचा एक हात लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतीश बारणे यांनी पुढाकार घेऊन भोसरी चे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोशी परिसरातील सलून चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या अडचणीच्या काळात अतिश बारणे यांनी केलेल्या या मदतीमुळे अनेक सलून चालकांच्या कुटुंबांना आधार मिळाला आहे यावेळी या सर्व सलून चालकांनी अतिश बारणे यांचे आभार व्यक्त केले.