शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी, -पिंपरी-चिंचवड शहरात COVID 19 लसीकरण सुरू आहे प्रभाग क्रमांक 30 दापोडी फुगेवाडी कासारवाडी सोसायटीमधील 18 ते 44 व 45 पुढील रहिवासी यांना राहत्या ठिकाणी covid-19 लसीकरण करण्यात यावे अशी मागणी या प्रभागाच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की प्रभागातील ज्या सोसायट्या गृहरचना आहेत येथील रहिवाशांना covid-19 लसीकरण राहत्या ठिकाणी करण्यात यावे जेणेकरून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे होईल तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना औषधा अभावी ताटकळत थांबावे लागणार नाही कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल व जास्त गर्दी होणार नाही तसेच लसीकरण मोहीम राबविताना नगरसेविका स्वाती माई काटे यांच्या माध्यमातून मनुष्यबळ, स्वयंसेवकउपलब्ध करून दिले जातील या अनुषंगाने प्रशासना वर मनुष्यबळाचा जास्त भार पडणार नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांची धावपळ कमी होईल व लसीकरण मोहीम सुलभ होईल तरी प्रभाग क्रमांक 30 दापोडी , फुगेवाडी , कासारवाडी सोसायटीमधील 44 व 45 पुढील रहिवासी यांना राहत्या ठिकाणी covid-19 लसीकरण करण्यात यावे असे नगरसेविका स्वाती माई काटे यांनी म्हटले आहे