शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी, -प्रभाग 28 रहाटणी-पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी गेट 4 या सोसायटीच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांच्या घरचा कचरा वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सोसायटीच्या वतीने गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला.
रोझलँड रेसिडेन्सी कोरोना मुक्त सोसायटी झाली. त्याबद्दल कचरा वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रोझलँड सोसायटीचे चेअरमन संतोष मसकर यांनी मनपा चे पिंपळे सौदागर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल तपशाळकर यांचे व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले.तसेच डॉ. प्रफुल्ल तपशाळकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सकाळ वृत्तपत्रच्या पत्रकार वैशाली भुटे, रोझलँड सोसायटीचे चेअरमन संतोष मसकर, कमिटी मेंबर रमाकांत वाघुळदे,कुणाल आयकॉन सोसायटीचे . जॉन डिसूझा आणि कर्मचारी उपस्थित होते.