पुणे प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज व प्रमुख विश्वस्त अमोल राजेभोसले यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून स्वामी भक्त परिवार सिंहगड रोड, पुणे व कलारंग परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील तीनशे कलाकारांना स्वामी प्रसाद म्हणून अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ कलाकार, नामवंत कलाकार व विशेष करून दिवंगत कलाकारांची आठवण ठेवून त्यांच्या कुटुंबीयांना घरपोच स्वामींच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सिंहगड रोड येथील अनुश्री मंगल कार्यालय येथे कोरोना नियमांचे पालन करून व सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पहिल्या दिवशी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे विश्वस्त बाळासाहेब दाबेकर, अखिल चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश चौधरी, ज्येष्ठ कलाकार जयमाला इनामदार, सुनील गोडबोले, दीपक रेगे, सामाजिक कार्यकर्ते युवराज निंबाळकर, उमेश गालिंदे, ऋषिकेश बालगुडे, अनुश्री कार्यालयाचे प्रमुख सचिन कळंबे व कलारंग परिवाराचे संतोष उभे आणि नितीन सुतार उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी मोटर वाहन निरीक्षक मारुती हजारे, एलआयसीचे अधिकारी अजय लाड, युनियन जनरल सेक्रेटरी परेश पारेख, डॉ. चंद्रकांत मंडलिक, संगीत क्षेत्रातील पंडित संजय गरुड, धनश्री कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पालखे, संदीप गांजवे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कलारंग परिवार प्रमुख कार्यवाहक संतोष उभे, नितीन सुतार, केदार मोरे, राजेंद्र साळुंखे, अनिल जिनगरे, चंद्रकांत निगडे, सुजित निकम, रवींद्र खराडे, दिपाली देवळालीकर यांनी केले.