आजपर्यंत केलेली सेवा गुरुचरणी समर्पित- देशमुख महाराज
शबनम न्यूज / पुणे
पुण्यातील कोविड रुग्णान करिता श्री देशमुख महाराज फाऊंडेशन व नक्षत्र वस्र कला दालन यांच्या संयुक्त विद्यमाने चालू केलेले अन्नछत्र- अखंड चुल या उपक्रमाचा समारोप सोमवार दिनांक ३१ मे २०२१ रोजी करण्यात आला. ४ मे पासून सुरू असलेली ही अखंड अन्नसेवेत दररोज सकाळ सायंकाळ ३०० हून अधिक कोव्हीड रूग्णांना मोफत पौष्टिक आहार दिल्या जात होता. समारोपाच्या या कार्यक्रमा प्रसंगी श्री देशमुख महाराज संस्थापक अध्यक्ष, देशमुख महाराज, सुवर्णा बालेघाटे (विश्र्वस्त देशमुख महाराज फौंडेशन) नरहर शिदोरे (चिटणीस देशमुख महाराज फौंडेशन) श्री. शितल महाराज (अध्यक्ष, ओम चैतन्य सद्गुरू स्वामीजी सेवाभावी न्यास) डॉ. साहेबराव वाघमारे (सदस्य, ओम चैतन्य सद्गुरू स्वामीजी सेवाभावी न्यास) गणेश तुम्मा (संचालक, नक्षत्र कला दालन), डॉ.किशोर रुईकर (स्वारगेट, कोविड केअर सेंटर प्रमुख) सुधीर कुरुमकर (सद्गुरू गंगाधर स्वामी महाराज सेवा संस्था) आदि विश्र्वस्त उपस्थित होते.
शहरात सद्या परिस्थिती स्थीर होत असल्याने पुण्यातील कोविड रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. कोव्हीड सेंटरच्या प्रमुखांसोबत विचार विमर्श करून आम्ही आज पर्यंत केलेली सर्व सेवा गुरुचरणी समर्पित करतो असे म्हणत फाऊंडेशनचे अध्यक्ष देशमुख महाराज व सेवकांनी या सेवेचा समारोप केला. या वेळी अनेक स्वयंसेवकांनी आपले अनूभव व धन्यवाद व्यक्त केले तर गणेश तुम्मा यांनी आभार मानले.