शबनम न्यूज / पिंपरी
Covid 19 च्या महामारीमुळे मध्यमवर्गीय, रोजंदारीवर काम करणारे व दुर्बल घटकांना बेरोजगारी, पगारकपात, घरभाडे, जीवनावश्यक वस्तूंची वाढती किंमत, हप्ता, साथीचे आजार, औषधोपचार व दैनंदिन गरजा भागविता भागविता चांगलीच दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वतः साठी दोन वेळचे पुरेसे जेवण मिळवणे देखील कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फुटपाथवर गीत गावून आपली उपजीविका करणाऱ्या दृष्टिहीन बांधवांना सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे यांच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ठिकाणी रस्त्याच्या कडेला दृष्टिहीन बांधवांचा समूह काही मदत गोळा करण्यासाठी गाणे गाताना आपण कित्येकांनी पाहिले असतील. बऱ्याचवेळा आपण दुर्लक्षही करतो. अगोदरच शासनाने प्रतिबंध घातल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ तुरळक प्रमाणात होत आहे. तरीही हे अंध बांधव आपल्या कलेचे सादरीकरण करून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करत असताना संत तुकाराम नगर, पिंपरी येथील नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे यांच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
कोणावर अवलंबून न राहता आपली जबाबदारी हे पार पाडत आहे हे वाखवण्याजोगे निश्चितच आहे, तरीपण दिवसभर राबून त्यांची गरज तटपुंज्या रकमेतून पूर्ण होत असेल का हा देखील मोठा प्रश्न आमच्या समोर आला, कारण अगोदरच आर्थिकदृष्टया खचलेला माणूस किती प्रमाणात एखाद्याला मदत करणार ? त्यातच मोजकेच पुढारी, कार्यकर्ते व समाज सेवक रस्त्यावर उतरून गरिबांसाठी काम करताना दिसतात. बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्या मात्राला परमेश्वराकडून मिळालेल्या देणग्या आहेत, त्याचा वापर मनुष्याने योग्य समयी, योग्य ठिकाणी, योग्य तऱ्हेने करने हे परमेश्वराला अपेक्षित आहे, नाहीतर इतर प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यात काही फरक उरणार नाही. इतरांसाठी संकटसमयी काहीतरी करण्याची भावना म्हणजेच सामाजिक बांधिलकी. असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे मांडले.
संत तुकाराम नगर येथे हे बांधव गीत गात बसलेले असताना ही शिधा त्यांना सुपूर्त केली. त्या सर्व नागरिकांनी ब्र.डेव्हिड काळे यांचे आभार मानले .यावेळी अंध, अपंग, व्यंग लोक मदतीच्या अपेक्षेने वाट पाहताना जर तुम्हाला आढळले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना धीर द्या, प्रेमाने त्यांच्या कलेला उत्तेजन द्या, त्यांची गरज ओळखा व होईल तितके त्यांना मदतीचा हात द्या, कारण धडधाकट मनुष्य काहीतरी हालचाल करून आपली भूक भागवू शकतो, पण असे परावलंबी लोक आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे चालवत असतील याचा गांभीर्याने विचार करा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे नागरिकांना केले आहे.