शबनम न्युज / शिरूर
शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निओसिंम कामगारांच्या वतीने रावलक्ष्मी फाउंडेशन कोवीड सेंटर साठी रुपये एक लाख रुपयाचा धनादेश आमदार अशोकबापू पवार यांच्याकडे देण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री पंडित आप्पा दरेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे , राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन शिरुर तालुका अध्यक्ष विकास मासळकर, राहुल दरेकर, हेमंत हरगुडे, योगेश मेमाने, पांडुरंग निकम, हिरामण दरेकर, अमोल ढमढेरे, सोमनाथ जाधव, सुहास कांचन, हनुमंत पिंगळे, नवनाथ अंकुशे,व्यवस्थापन प्रतिनिधी स्वप्नील जठार, व कामगार वर्ग उपस्थित होते.
Advertisement