शबनम न्युज / पुणे
कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय प्राप्त करण्यासाठी रिक्षा चालकांनी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Autorieksha Financial Assistance Scheme येथे अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कार्यालयात आत्तापर्यंत 9 हजार 241 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 6 हजार 36 अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. व 1 हजार 369 अर्जांना फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले आहे तर 6 अर्ज नाकारण्यात आले आहेत. ही कार्यप्रणाली आधार क्रमांकाशी निगडीत असल्यामुळे आधार कार्डबाबतच्या अडचणी असल्यास परिवहन कार्यालयामध्ये अडचणी सोडविण्यासाठी आधार कार्ड केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या परवानाधारक ॲटोरिक्षा धारकांनी अद्याप अर्ज केले नाहीत त्यांनी त्वरित या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.