शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र.२८, रहाटणी – पिंपळे सौदागर या प्रभागात पावसाळ्यात चालू असलेले रस्ते खोदाईचे काम त्वरित बंद करावे, असे मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्र.२८, रहाटणी – पिंपळे सौदागर या प्रभागात महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामासाठी महापालिकेने नेमलेल्या बी.जी. शिर्के कंपनी या ठेकेदरामार्फत विविध कामासाठी रस्ता खोदाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पिंपळे सौदागर मध्ये संपूर्ण रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत खोद्लेलेया रस्त्यांचे काम देखील संथ गतीने सुरु असून सर्व रस्ते अपूर्ण अवस्तेत आहेत सध्या पावसाळा चालू झाला आहे पाऊस झाला की खोदकामामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार होते त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी, व चालताना नाहक त्रास होते आहे. तरी ही बाब विचारात घेता पावसाळा चालू झाला असून महानगरपालिका नियमाप्रमाणे जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये कसल्याही प्रकारचे खोदकाम करता येत नाही. तरी स्मार्ट सिटी ने नेमलेल्या बी.जी. शिर्के कंपनी यांनी सीवर लाईन, किवां अन्य कारणास्तव पिंपळे सौदागर मधील उर्वरित राहिलेले रस्ते खोदाईचे काम देखील चालू केले आहे ते त्वरित थांबवावे व अपूर्ण अवस्तेत असलेल्या उर्वरित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात याव्या.व महानगरपालिका नियमाप्रमाणे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यात कसल्याही प्रकारच्या रस्ते खोदाई चा कामास परवानगी देवू नये असे हि नगरसेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.