शबनम न्यूज / पिंपरी
सम्राट अशोकांचे पाईक कालकथित डॉ. अशोक शिलवंत यांच्या जयंती निमित्त पार्थ पवार फाउंडेशन व अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांच्या वतीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृर्ती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वाबळे यांचा ‘कोरोना वॉरियर सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देण्यात आले तसेच फुले पगडी परिधान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. वाबळे यांच्यासोबत वायसीएम रुग्णालयातील इतर सर्व डॉक्टर्स, रुग्णसेविका व कर्मचारी यांचाही पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
यावेळी रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हंटले कि पिंपरी चिंचवड शहराला कोरोना संकटात सुरक्षित ठेवण्यात यशवंतराव चव्हाण स्मृर्ती रुग्णालय प्रशासनाचा सर्वात मोठा हातभार आहे. आजवर हजारो रुग्णांना वायसीएम मध्ये जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू नागरिकांसाठी तर वायसीएम रुग्णालय खऱ्या अर्थाने वरदान ठरले आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर वायसीएम रुग्णालयाच्या रुग्णसेवेची ख्याती पोचली आहे. आणि या सर्व यशाचे श्रेय निर्विवादपणे यथील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, मामा, मावशी, सुरक्षारक्षक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णालय प्रमुख डॉ. राजेंद्र वाबळे या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच गंभीर स्वरूपाच्या कोरोना प्रादुर्भावही वायसीएम प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. म्ह्णूनच अशा कोरोना योद्ध्यांचा सुयोग्य सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या भावनेतून कालकथित डॉ. अशोक शिलवंत यांच्या जयंती निमित्त पार्थ पवार फाउंडेशन व अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, डॉ. विनायक पाटील, डॉ. किशोर खिलारे, डॉ. पाडळे, व्यवस्थापिका मोना चव्हाण, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. मारुती गायकवाड, माजी नगरसेविका स्मिता कुलकर्णी आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.