दत्तदिगंबर महिला नागरी सहकारी पत संस्थेच्या चेअरमन मंगलताई राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसा निम्मित श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांना अन्नधान्य वाटप आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने मा. महापौर राहुलदादा जाधव यांचा उपक्रम
चिखली, प्रतिनिधी – दत्तदिगंबर महिला नागरी सहकारी पत संस्थेच्या चेअरमन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर, नगरसेवक राहुल जाधव यांच्या सौभाग्यवती सौ.मंगलताई राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिम्मित भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली मा. महापौर राहुलदादा जाधव यांच्या वतीने श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांना सोमवारी अन्नधान्य वाटप करण्यात आले.
करोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्रामधील सर्व तीर्थ स्थळे भाविकांसाठी बंद आहेत आणी भीमशंकर मधील सर्व ग्रामस्थ हे श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आपला छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजरना करतात परंतु या टाळेबंदीच्या कला मध्ये या सर्व लोकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे हे लक्षात घेऊन आपण समजा प्रती काही तरी देणे लागतो या भावनेचा विचार करून आमदार महेशदादा लांडगे यांच्या संक्ल्पेनेतून श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ३०० कुटुंबाना प्रत्येकी २ किलो गहु १ किलो तांदूळ १ किलो साखर, अर्धा किलो डाळ १ किलो तेल चहा पावडर इ. संसार उपयोगी साहित्य भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे याच्या हस्ते वाटण्यात आले.
यावेळी बोलताना राहुल जाधव म्हणाले कि हि मदत अत्यंत तुटपुंजी आहे पण आम्ही यालोकांसाठी आपल्या परीने काहीतरी मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील सर्व तीर्थ स्थळावरील ग्रामस्थांच्या अश्याच प्रकारच्या समस्या आहेत तरी राज्य शासनाने या गोष्टी कडे लक्ष देऊन तीर्थ स्थळा वरील व्यावसायिकांना ठोस मदत करण्याची गरज आहे.
यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव आणी मंगलताई जाधव यांच्या या
उपक्रमाचे कौतुक केले यावेळी भीमाशंकर देवस्थानचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी राहुल जाधव, मंगलताई जाधव तसेच आमदार महेशदादा लांडगे यांचे आभार मानले.