हडपसर व विमाननगर येथील निवासी सदनिकांची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु
शबनम न्युज / पुणे
पुणे मेट्रो प्रकल्प 1, 2 व 3 यामुळे कामगार पुतळा व राजीव गांधी नगर, शिवाजीनगर, पुणे येथील बाधीत होणा-या झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना विमाननगर व हडपसर येथील उपलब्ध असलेल्या निवासी सदनिकांचे मोफत वाटप करणेबाबत शासनाकडून निर्णय झाला असून सर्व पात्र झोपडीधारकांना वितरीत करावयाच्या विमाननगर येथील उर्वरीत व हडपसर येथील सर्व उपलब्ध निवासी सदनिकांच्या नोंदणीकरणाचे (रजिस्ट्रेशन) व प्रत्यक्ष सदनिका वितरीत करण्याचे काम शुक्रवार दि. 4 जून ते मंगळवार दि.8 जून 2021 पर्यंत (शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवसांसह) पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
हडपसर येथील सी व डी विंग इमारतीमधील सर्व सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.10,5, फायनान्स रोड, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पुणे-1 येथे विमाननगर येथील सी, डी, विंग मधील उर्वरित सदनिका धारकांनी सह-निबंधक वर्ग-2, अनुक्रमे हवेली क्र. 21 व 22, सर्व्हे नं. 39/2/2, सिटी सर्व्हे नं.943, गांधी लॉन्स समोर, युगाई मंगल, पहिला मजला, एरंडवणे येथे तर विमाननगर येथील ई विंग मधील सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.25, विनी यार्ड चर्चच्यासमोर, सिध्दी टॉवर्स, सीएनजी पेट्रोलपंप मागे, गणेशनगर, दापोडी, पुणे-12 येथे नोंदणी करावी.
वरीलप्रमाणे सदनिकांचे नोंदणीकरण हे प्रथम उपस्थित राहणा-यास प्राधान्य त्यानुसार वरील पाचही संबंधित सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत प्रति कार्यालय 30 सदनिकांचे टोकन पध्दतीने नोंदणीकरण करण्यात येईल. मूळ आधारकार्ड व हे सुचनापत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तरी त्यानुसार संबंधितांनी आपल्या संबंधित कार्यालयामध्ये वेळेत उपस्थित रहावे.
वरीलप्रमाणे सदनिकेच्या नोंदणीकरीता आपण दिलेल्या दिवशी व वेळी उपस्थित न राहिल्यास आणि / अथवा नोंदणीकरण होऊन निश्चित केलेल्या कालावधीत प्रत्यक्ष त्यांचे सदनिकेचा ताबा न घेतल्यास त्यांना याकामी सदनिका स्विकारणेसाठी आपण इच्छुक नाही असे समजून आपणांस वितरीत करण्यात आलेली मोफत सदनिका रद्द करण्याची व आपली सध्याच्या झोपडीच्या निष्कासनाची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. याची अधिक माहिती कार्यालयाच्या srapune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.