- भाजपा ओबीसी मोर्चाचा इशारा
- पिंपरी-चिंचवडमध्ये निषेध आंदोलन
शबनम न्युज / पिंपरी
आरक्षण जाहीर करताना राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का लावला, तर आगामी काळात राज्यात निवडणुका होवू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चोने दिला आहे.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आणि तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. ओबीसी आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यात हे ठाकरे सरकार अपयशी ठरलेल आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय जर घेतला नाही, तर ओबीसी मोर्चा या राज्यांमध्ये कुठलीही राजकीय निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर यांनी दिला महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर पिंपरी-चिंचवड शहर भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सदाशिव खाडे ,राजु दुर्गे, विना सोनवलकर, राजेश डोंगरे, कैलास सानप, शंकर लोंढे, योगेश आकुलवार, नेहूल कुदळे, ललित म्हसेकर, योगेश वाणी, गणेश वाळुंजकर, गणेश ढाकणे, सचिन मदने, अभिषेक करपे, मनोज ब्राह्मणकर, जयश्री देशमाने, लता हिंदळेकर, किरण पाचपांडे, मनिषा ढोणे, मिना सानप, सुनिता पाटील उपस्थित होते.