शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनिषा पवार यांचा वाढदिवस येत्या 6 जून रोजी येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना निर्बंध सप्ताह हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.
यामध्ये रविवारी 6 जून रोजी प्रभागांमध्ये 2 हजार आरोग्य किट वाटप करण्यात येणार आहे, सोमवार दिनांक 7 जून रोजी ऑनलाइन लसीकरण नोंदणी करण्यात येणार आहे, मंगळवार दिनांक 8 जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, बुधवार दिनांक 9 जून रोजी प्रभागात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात येणार आहे, गुरुवार दिनांक 10 जून रोजी गरजू नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात येणार आहे, शुक्रवार दिनांक 11 जून रोजी क्वारंटाईन सेंटरला फळे वाटप करण्यात येणार आहे, तसेच शनिवार दिनांक 12 जून रोजी रक्तदान शिबिर व कोरोना योद्धा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या संपूर्ण सप्ताहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून नगरसेविका मनिषा पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. तसेच या सप्ताहात कोरोना, काळी बुरशी यावर मार्गदर्शन कोरोना बाबत समज-गैरसमज याबाबत तज्ञांकडून माहितीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी गरजू नागरिकांनी सदर उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनिषा पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.