शबनम न्युज / पिंपरी
प्लाझ्मा डोनर लाभ प्रोत्साहन भत्ता २०००/-त्वरीत द्यावे अन्यथा भिकमांगो आंदोलन करण्यात येणार असल्या चा इशारा छावा क्रांतीवीर सेना पिंपरी-चिंचवड विधानसभा.वतीने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना देण्यात आला आहे निवेदनात संजयभाऊ ठाकरे.(अध्यक्ष). यांनी म्हंटले आहे कि . कोरोना काळात प्लाझ्मा थेरेपी चा खुप फायदा झाला.परंतु डोनर स्वतः:हुन पुढे येत नव्हते.त्यांच्यामध्ये समज-गैरसमज होते.परिणामी रुग्ण नातेवाईकांनची प्लाझ्मा डोनर शोधण्यासाठी दमछाक होत होती.खुप शोधुन आणि सापडुन देखिल प्लाझ्मा डोनर मिळत नव्हते.मिळाले तरी योग्य आँन्टिबाँडीस नसतील तर ते डोनर घेत नव्हतं.
यासर्व प्रकार लक्षात घेता मेहेरबान महानगरपालिका प्रशासनाने नविन फंडा २० एप्रिल २०२१ रोजी पेपर प्रसिद्धी करत. सरकारी हाँस्पिटल म्हणजेच वाय.सी.एम.प्लाझ्मा दान करणार्यास २०००/–रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल सांगण्यात आले प्रत्येक्षात प्रशासनाचा भोंगळ कारभार २७ मे उजाडले मात्र प्रशासनाने ना कोणता फतवा काढला ना काही केले. याचा अर्थ असा समजावा कि महानगरपालिकेच्या योजना ह्या फसव्या आहेत.
सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा आणि निंदनीय आहे.महानगरपालिकेची बदनामी करणारा आहे.एक प्रकारे आश्वासन देऊन फसवणूक करणारा आहे.सदर प्रकारास महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे.संबंधित प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत.कामचुकार पणा कुठेतरी प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.
आपणास विनंती वजा इशारा देण्यात येत आहे कि सदर प्लाझ्मा डोनर यांच्या कागद पत्र पाहुन त्यांना त्वरित प्रोत्साहन भत्ता २०००/- देण्यात यावा.अन्यथा येत्या १०/०६/२०२१ रोजी ठिक १० वाजता प्लाझ्मा डोनर यांच्या वर झालेल्या फसवणूकीवर आवाज उठवित “भीक मांगो “आंदोलन महापालिकेच्या प्रवेश व्दारा समोर केले जाईल. यासर्व परिस्थितीला प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद केले आहे