शबनम न्युज / सांगवी
पिंगळे गुरव,नवी सांगवीत सध्या पाच ते दहा गटगटाने मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडुन बसलेली आसतात. किंवा बिनधास्त पणेउभी आसतात, त्यामध्ये वळू (पोळ) पण आसतात ,महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. पावसाळी दिवस असल्यामुळे रस्ते निसरडे होतात. त्यातच एक महीण्यापासुन लाँकडाऊन आहे. कोरोना मुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. शासनाने निर्बंध तिथिल केल्यामुळे नागरिक आपल्या व्यवसायाठी व नोकरीसाठी बाहेर पडत आहे.अशा वेळी चौकाचौकात गटगटाने मोकाट जनावरे पाहवयास मिळतात. नागरिकांना व वाहनांनाही घाबरत नाहीत.नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावर ही धावून येतात .वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते, मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकां बरोबरच जेष्ट नागरिक,महीला व लहान मुलांनाही आहे. उभे असलेले मोकाट जनावरे काटे पुरम चौकातील आहे.असे अनेक ठिकाणी सकाळ ,संध्याकाळ,जास्त प्रमाणात आसतात.
महानगरपालिकेने अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरीकांची सुटका करावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, व गजानन धाराशिवकर यांनी केली आहे.