शबनम न्युज / पिंपरी
गुरुवार दिनांक ०३ जून २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)आयोजित राष्ट्रवादी भाषण वर्गाच्यावतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मला नेत्यांना काही सांगायचे आहे या विषयावर लेखी स्पर्धेचे आयोजन केले होते. एकुण वीस (२०) स्पर्धकांनी भाग घेतला होता. अनेक कार्यकर्त्यांनी या लेखाच्या माध्यमातून आपल्या विचारांना सुचनांना भावनांना वाट मोकळी करून दिली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) म्हणाले की पक्षाला आपल्या सुचनांचा, विचारांचा, कल्पनांचा नक्कीच फायदा होईल. तसेच शहराध्यक्ष यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन प्रथम क्रमांक .माधव पाटील, द्वितीय क्रमांक,प्रकाश परदेशी, तृतीय क्रमांक सौ.पल्लवी पांढरे या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला आणि सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी भाषण वर्ग प्रमुख हरिष मोरे , गोरक्षनाथ पाषाणकर ,सौ. मनिषा गटकळ, श्री. संतोष वाघेरे,श्री.गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते.
आयोजक हरिष मोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन औटे यांनी केले. सुत्रसंचालन सौ. संगिता आहेर तर आभार सौ. स्वप्नाली आसोले यांनी मानले. कार्यक्रमास श्री.सुदाम शिंदे,सौ. सुगंधा पाषाणकर, सौ.निर्मला माने, सुनिल आडागळे यांनी परिश्रम घेतले.